मानवाने उंची, आयुष्य आणि शारीरिक कार्यक्षमतेची सीमा गाठल्याचे अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. गेल्या 150 वर्षातल्या मानवी इतिहासा वर दृष्टिक्षेप टाकून प्रथमच करण्यात आलेल्या संशोधना तून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.मानवावर काही जैविक मर्यादा आहेत. पर्यावरण, हवामानबदल मानवाच्या मर्यादांवर परिणाम करतात. पुढची पिढी आणखी दीघार्युषी होईल, असा दावा अनेकदा केला जातो. मात्र, मानवाच्या आयुर्मानाने मर्यादा गाठली आहे. कितीही प्रयत्न केले तरी जैविक मर्यादेचा उंबरठा आपण ओलांडू शकत नाही, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.आपल्या मर्यादांची कल्पना येणारी ही पहिलीच पिढी आहे. यापुढे विज्ञान, औषधे, पौष्टिक आहार यापैकी कोणताही पर्याय वापरून आपण आपले आयुर्मान, उंची किंवा कार्यक्षमता वाढवू शकत नाही. त्यामुळेच भविष्यात क्रीडा क्षेत्रातील विक्रमांचे प्रमाण कमी होत जाईल, असे फ्रान्सच्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews